भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स

भारतीय नागरिक कुलभूषण जाधवांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळं भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाक उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झाल्यास ही हत्या असल्याचं समजण्यात येईल असा सज्जड इशारा भारतानं पाकिस्तान उच्चायुक्तांना दिला आहे.

Updated: Apr 10, 2017, 06:29 PM IST
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स title=

नवी दिल्ली : भारतीय नागरिक कुलभूषण जाधवांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळं भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाक उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झाल्यास ही हत्या असल्याचं समजण्यात येईल असा सज्जड इशारा भारतानं पाकिस्तान उच्चायुक्तांना दिला आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव हे भारतच्या रॉ या गुप्तहेर यंत्रणेचे सदस्य असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 3 मार्च 2016 मध्ये त्यांना पाकिस्तानातल्या बलूचिस्तानमधल्या मश्केल इथून अटक करण्यात आली होती.

पाकिस्तानच्या फिल्ड जनरल कोर्ट मार्शलद्वारे कुलभूषण जाधव यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. कुलभूषण जाधव भारतीय हेर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा, भारत सरकारनं पहिल्यापासूनच इन्कार केला होता. कुलभूषण जाधव माजी भारतीय नौदल अधिकारी असून, नोकरी सोडल्यानंतर जाधव यांचा भारत सरकार तसंच भारतीय नौदलाची काहीही संबंध नसल्याचं भारत सरकारनं आधीच स्पष्ट केलं आहे.