पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी

पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.

Updated: Dec 17, 2014, 09:54 AM IST
पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी title=

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.

पाकिस्तान मंगळवारी पुन्हा हादरलं. आर्मी स्कूलमध्य़े दहशतवाद्यांनी निरागस शाळकरी मुलांसह निरपराधांचा बळी घेतला. तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. मात्र या हल्ल्यामुळं भारतालाही तितकंच दक्ष राहणं गरजेचं झालंय. शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात तालिबान्यांचा वाढता प्रभाव भारतासाठी धोक्याची घंटा मानली जातेय. त्यामुळं तालिबान आणि पाकिस्तानबाबत भारतानं रोखठोक भूमिका घ्यावी असं तज्ज्ञानं वाटतंय.

पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादाचा परिणाम भारतावर होणार हे मानलं जात असलं तरी भारताची सुरक्षा यंत्रणा कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यास समर्थ असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. तरीही पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतीय सीमांच्या सुरक्षा वाढवणं, दहशतवाद्यांच्या एंट्री पॉइंट्वर नजर ठेवणं, स्लीपर सेल नेस्तानाबूत करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.

सिडनीतील ओलीस नाट्य आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानातील दहशतवादी हल्ला यामुळं सुरक्षा यंत्रणांना डोळ्यात तेल घालून भारतीय सीमांचं रक्षण करावं लागणार आहे. त्याशिवाय राजनैतिक दबावासोबतच दहशतवादाचा सामना एकजुटीनं करावा लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.