मुंबई : एटीएम युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढता पण कधी-कधी एटीएममधून पैसेच येत नाही पण तुमच्या अंकाऊटमधून ते कमी होतात. अशा वेळेस तुम्ही बँकेत संपर्क करु शकता आणि याचा एक फायदा देखील तुम्हाला होणार आहे.
आरबीआयच्य़ा एका कायद्यानुसार जर तुमच्या अंकाऊटमधून पैसे गेले तर तुम्हाला बँकेने ते ७ दिवसाच्या आत परत केले पाहिजे. असं न केल्यास बँकेकडून तुम्ही प्रत्येक दिवशी १०० रुपये वसूल करु शकता.
एटीएमचं ट्रांजेक्शन फेल झाल्यास तुम्ही ३० दिवसाच्या आत त्याची तक्रार बँकेत केली पाहिजे. यासाठी तुम्ही बँकचे पासबुक. एटीएम, पावती सोबत ठेवा. पण एटीएमचं पिन कोड कोणासोबतही शेअर करू नका.
बँकेत तक्रार दिल्यानंतर ब्रांच मॅनेजर कडून तक्रारीची कॉपी घेणं विसरु नका. त्यावर बँकेचा सिक्का घ्या.
तक्रार केल्यानंतर ७ दिवसाच्या आत पैसे परत नाही आले तर एनेक्जर फॉर्म भरुन मॅनेजरला द्या. हा फॉर्म भरुन दिल्यानंतर तुम्हाला बँकेकडून पेनल्टी मिळेल.
समझा, जर तुम्ही ५००० रुपये काढले पण एटीएम मशीन मधून पैसे आले नाहीत. तर तुम्ही एनेक्जर फॉर्म भरुन दिल्यानंतर त्या दिवसापासून तुम्हाला प्रतिदिन १०० रुपये प्रमाणे पैसे मिळतील. जर तुम्हाला पैसे सुरुवातीचे ७ दिवस सोडून १० दिवसानंतर पुन्हा मिळाले तर १००० रुपये आणि तुमचे ५००० असे ५१०० रुपये तुमच्या अकाऊंट जमा होतील.
बँक जर तुम्हाला पैसे देत नसेल तर या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवा. https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm