आयआयटी टॉपरने मायक्रोसॉफ्टची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली

आयआयटी खडगपूरच्या प्रत्येक विभागात बीटेकमध्ये सर्वाधिक जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांने एका बहुराष्ट्रीय कंपनीची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावून लावली. या विद्यार्थ्यांने  शिक्षण अकादमीसंदर्भातील क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

PTI | Updated: Jun 12, 2015, 03:52 PM IST
आयआयटी टॉपरने मायक्रोसॉफ्टची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली title=

कोलकाता : आयआयटी खडगपूरच्या प्रत्येक विभागात बीटेकमध्ये सर्वाधिक जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांने एका बहुराष्ट्रीय कंपनीची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावून लावली. या विद्यार्थ्यांने  शिक्षण अकादमीसंदर्भातील क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

संगणक विज्ञान आणि अभियांत्रीकीचा विद्यार्थी शिखर पत्रनबीस याने यावर्षी ९.८७ पॉईंट मिळविलेत. त्याने यावर्षी सर्वाधिक गुण पटाकवलेत. त्याला President of India Gold Medal या पुरस्काराने सन्मानिय करण्यात येऊ शकते.

शिखरला मायक्रोसॉफ्टच्यावतीने मोठ्या पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव आला होता. मात्र, हा प्रस्ताव त्याने नाकारला आहे. शिखरने आयआयटी परिसरात राहून मोठ्या संगणकासाठी लागणाऱ्या सिस्टमच्या हार्डवेअरवर सुरक्षसंदर्भात पीएचडी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिखरने सांगितले, बीटेक केल्यानंतर कॉरपोरेट कंपनीत काम करण्याची ईच्छा नाही. माझी आवड ही संशोधन करण्याबाबत आहे. माझ्या निर्णयावर माझ्या शिक्षकांनी आणि कुटुंबाने मला साथ दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.