कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाचा पुढाकार

मोबाईलमध्ये होणाऱ्या कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं पुढाकार घेतलाय. मंत्रालयानं याबाबत तोडगा काढण्यासाठी ट्रायकडे विचारणा केली आहे. 

Updated: Jun 12, 2015, 12:28 PM IST
कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाचा पुढाकार title=

नवी दिल्ली : मोबाईलमध्ये होणाऱ्या कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं पुढाकार घेतलाय. मंत्रालयानं याबाबत तोडगा काढण्यासाठी ट्रायकडे विचारणा केली आहे. 

यात कॉलड्रॉप्सचं प्रमाण कमी करण्यासाठी तसंच कॉलड्रॉप झाल्यास ग्राहकांना परतफेड करण्याबाबत पर्याय सुचवण्यास सांगण्यात आलंय. गेल्या आठवड्यात दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत संकेत दिले होते. त्यानंतर आता विभागानं ट्रायला पत्र पाठवल्याचं दूरसंचार सचिव राकेश गर्ग यांनी सांगितलंय. 

ट्रायनं आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्व न पाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गर्ग यांनी दिलाय. स्पेक्ट्रम शेअरिंग आणि ट्रेडिंगला परवानगी दिल्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना फायदा होईल, तसंच कॉल ड्रॉपचं प्रमाण कमी होईल.

यामुळे भविष्यात मोबाईल इंटरनेट अधिक वेगवान आणि स्वस्त होण्यासही मदत होणार आहे. या नव्या नियमांना महिनाअखेरीस केंद्रीय कॅबिनेटचा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.