नवी दिल्ली : देशात गरीब, श्रीमंत, मध्यम अशी असमानता दिसून येते. त्यामुळे देशात मीडल क्लासची ओळख करणं तसं कठीणचं. जगाच्या तुलनेत भारतात मध्यम वर्गला घेऊन जी मते आहेत ती 'प्यू रिसर्च सेंटर'च्या अभ्यासात खोटी ठरवली आहेत.
'प्यू रिसर्च सेंटर'च्या अहवालानुसार भारत हा देश आधीपासूनच गरीब आहे. पण अहवालानुसार १५ टक्के भारताची लोकसंख्या ही मध्यम वर्गाच्या गटवारीत बसत नाही. या अभ्यासात प्रत्येक देशाची लोकसंख्या ५ गटात विभागली होती. ज्याचे वर्गीकरण कुटुंबाच्या दिवसाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे.
यात म्हटल्याप्रमाणे जगातील एकूण लोकसंख्येमध्ये ज्या व्यक्तींचे उत्पन्न २ डॉलरपेक्षा कमी आहे ते गरिबी रेषेच्या खाली आहेत. तर २ ते १० डॉलरच्यामध्ये येणारी लोकसंख्या गरीब रेषेच्या वर असल्याचे मानले जाते. १० ते २० डॉलरमध्ये ज्यांचे उत्पन्न येते ती लोकसंख्या मीडल क्लास या गटात मोडते. अहवालानुसार भारतात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या गरिबीरेषेच्या खाली आहे. आणि फक्त २ टक्के लोकसंख्या मध्यम वर्ग गटात मोडते. देशात मागील दशकापेक्षा आता गरिबीचा दर बराच खाली आला आहे. पण तरीही हा आकडा निराशाजनक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.