'कोई माई का लाल' राम मंदिर रोखू शकत नाही - सपा खासदार मुनव्वर सलीम

 समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार चौधऱी मुनव्वर सलीम यांच्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वक्तव्याने समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Updated: Jan 7, 2015, 05:01 PM IST
'कोई माई का लाल' राम मंदिर रोखू शकत नाही - सपा खासदार मुनव्वर सलीम title=

नवी दिल्ली :  समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार चौधऱी मुनव्वर सलीम यांच्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वक्तव्याने समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

मुनव्वर सलीम यांनी राम मंदिर बनविण्याची बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले राम मंदिर बनविण्यापासून 'कोई माई का लाल' रोखू शकत नाही. मलेशिया सारख्या मुस्लिम देशात राम मंदिर आहे. मग हिंदुस्तानात राम मंदिर बनणार नाही तर कुठे बनणार असा सवालही उपस्थित केला आहे. 

त्यांना अयोध्येत राम मंदिरच्या निर्माणावर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की हिंदुस्तानात राम मंदिर कुठेही बनू शकते. हे बनविण्यापासून  'कोई माई का लाल'  नाही. 

विशेष म्हणजे मुनव्वर सलीम हे यूपीमधून राज्यसभा खासदार असून मुलायम सिंह यांनी राज्यसभा कोट्यातून त्यांना खासदार बनवले आहेत. 

भाजपने सलीम यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले आहे. भाजपचे नेता लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी सांगितले, सलीम यांनी हे विधान आझम खान यांना विचारून केले आहे का आणि तसे असेल तर ते या वक्तव्यावर ते किती काळ राहणार असाही प्रश्न उपस्थित केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.