'संकुचित मनोवृत्तीबद्दल काय बोलावे' : सोनिया

सोनिया गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या भाजपा खासदाराला सोनिया गांधी यांनी उत्तर देण टाळलं आहे. 'संकुचित मनोवृत्तींच्या लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे मला कठीण वाटते. मी अशा वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही', असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय.

Updated: Apr 2, 2015, 07:24 PM IST
'संकुचित मनोवृत्तीबद्दल काय बोलावे' : सोनिया title=

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या भाजपा खासदाराला सोनिया गांधी यांनी उत्तर देण टाळलं आहे. 'संकुचित मनोवृत्तींच्या लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे मला कठीण वाटते. मी अशा वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही', असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय.

भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीराजसिंह यांनी 'सोनिया गांधी नायजेरियन वंशाच्या असत्या, तर कॉंग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले नसते' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव राम माधव यांनी 'गिरीराजसिंह यांनी स्पष्टीकरण दिले, विषय संपला' असे म्हटले होते. 

रॉबर्ट वद्रा यांनी सोनिया गांधी या सन्माननीय महिला असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्र्याच्या अशा टिप्पणीवरून एकूणच महिलांबाबतचा त्यांचा दृष्टीकोन काय आहे याचा अंदाज येतो असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.