मी `आप`चा पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही : केजरीवाल

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांचं नाव आम आदमी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात यावं, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं होतं. यावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Updated: Jan 4, 2014, 08:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांचं नाव आम आदमी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात यावं, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं होतं. यावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव हे आपल्यावरील प्रेमापोटी अशी इच्छा व्यक्त करत असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, आपली इच्छा आहे की, अरविंद केजरीवाल यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवावं, मात्र अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
योगेंद्र यादव हे आम आदमी पक्षात सामिल होण्यापूर्वी राजकीय विश्लेषक होते, म्हणून त्यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे. आम आदमी पक्षाकडून आपण निवडणूक लढवणार नसलो, तरी जास्तच जास्त ठिकाणी आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.