सोशल मीडियावर झालं प्रेम, डेटच्या दिवशी बसला धक्का

सोशल मिडियावर ओळख, चॅटींग आणि मग प्रेम. असंच काही घडलंय या जोडप्याबाबत. प्रियकर आणि प्रेयसी म्हणून चॅट करत एकमेकाच्या प्रेमात पडले, पण जेव्हा एकमेकांच्या समोर आले तेव्हा दोघांनाच चांगलाच धक्का बसला.

Updated: Jun 9, 2016, 06:04 PM IST
सोशल मीडियावर झालं प्रेम, डेटच्या दिवशी बसला धक्का title=

चंदीगड : सोशल मिडियावर ओळख, चॅटींग आणि मग प्रेम. असंच काही घडलंय या जोडप्याबाबत. प्रियकर आणि प्रेयसी म्हणून चॅट करत एकमेकाच्या प्रेमात पडले, पण जेव्हा एकमेकांच्या समोर आले तेव्हा दोघांनाच चांगलाच धक्का बसला.

डेटसाठी एकमेकांना भेटण्याचं ठरलं. पण जेव्हा समोर आले तेव्हा दोघं नवरा-बायको निघाले. लव-मॅरिज करूनही आपसात पटत नसल्याने दोघं सोशल मिडियाचा आसरा घेवू लागले. दोघांनी फेक आयडी बनवली आहे आणि सुरु झाले.

नवरा-बायको जेव्हा समोर आले तेव्हा दोघांमध्ये मारहाण सुरु झाली. मग प्रकरण पोलिसांसमोर पोहोचलं. मागील ६ महिन्यांपासून हे दोघेही वेगळे राहत होते.