www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
‘ऑईल अॅन्ड नॅच्युरल गॅस कमिशन’ च्या (ओएनजीसी) देहरादून फ्रंटियर बेसिन टीमनं उत्तरप्रदेशस्थित मऊ जिल्ह्यात नैसर्गिक वायूचा खजानाच शोधून काढलाय.
मऊ जिल्ह्यातील इंदारा साईटवर लवकरच गॅसचे साठे शोधून काढण्यासाठी खणण काम सुरू होणार आहे. टीमनं दिलेल्या माहितीनुसार ओएनजीसीला दोन-तीन बिलियन क्युबिट फीट गॅस इथं सापडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे गंगा बेसिन (यूपी, बिहार) तसंच विंध्य बेसिन (राजस्थान, एमपी)मध्येही खणण काम सुरू आहे. विंध्य बेसिनमध्ये नोहता आणि दमोह या दोन खाणींचं थोडं थोडं खणणकाम सुरू आहे.
हायड्रोकार्बन इंधन भांडारांसाठी अभ्यास सुरू
हायड्रोकार्बन उत्पादन (पेट्रोल, नॅच्युरल गॅस, सीएनजी, एलपीजी, गॅसोलिन, केरोसिन, नेप्था) हे इंधनाच्या मोठ्या स्त्रोताच्या रुपात समोर आले आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसमवेत आणखी काही राज्यांमध्ये या साठ्यांचे स्त्रोत हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामुळेच ओएनजीसीनं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, यूपी, एमपी, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात हायड्रोकार्बन पदार्थांच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी जियो सायंटिफिक परिक्षण सुरू केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.