रेल्वे तिकीट हरवल्यास असे मिळवा डुप्लिकेट तिकीट

रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे ट्रेनचे तिकीट बेपत्ता झाल्यास हैराण होण्याची गरज नाही. 

Updated: Dec 25, 2015, 11:27 AM IST
रेल्वे तिकीट हरवल्यास असे मिळवा डुप्लिकेट तिकीट title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे ट्रेनचे तिकीट बेपत्ता झाल्यास हैराण होण्याची गरज नाही. कारण तुम्ही हरवलेल्या तिकीटाची बनावट कॉपीही मिळवू शकता. 

सर्वात आधी जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआरची नोंद करा आणि त्यानंतर रेल्वे स्थानकाचे सुपरिटेंडेट यांना याची पूर्ण माहिती द्या. डुप्लीकेट तिकीट बनवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. सेकंड क्लास आणि स्लीपर क्लासच्या तिकीटांसाठी ५० आणि इतर क्लासच्या तिकीटांसाठी १०० रुपये चार्ज देऊन डुप्लिकेट तिकीट देण्यासाठी अर्ज करावा लागेल. या अर्जाद्वारे तुम्ही डुप्लीकेट तिकीट रिझर्व्हेशन काऊंटरवरुन मिळवू शकता. 

तिकीट फाटले असल्यास अथवा आरएसीचे डुप्लीकेट तिकीट मिळवण्यासाठी २५ आणि १० टक्के रक्कम अधिक द्यावी लागेल. राजधानी आणि शताब्दी रेल्वेंच्या डुप्लीकेट तिकीटांसाठी एकूण तिकीटांपैकी २५ टक्के अधिक रक्कम जमा करावी लागेल. याचप्रकारे सामान्य श्रेणीच्या रेल्वेंमध्ये पहिल्या ५०० किमीच्या प्रवासाला एकूण तिकीटाच्या रकमेपैकी २५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक किलोमीटरच्या प्रवासाला १० टक्के अधिक रक्कम मोजावी लागेल. 

मात्र हरवलेले तिकीटाचे डुप्लिकेट तिकीट मिळवण्यासाठी एकूण तिकीटाच्या रकमेपैकी ५० टक्के अधिक रक्कम द्यावी लागेल.