... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी

'लष्कर-ए-तोयबा'चे दहशतवादी भारतात पोहोचल्याचा संदेश देण्यासाठी एक कोड वापरतात. ते झाडावर लाल कपडा बांधतात, ज्यामुळं त्यांच्या म्होरक्यांना ते पोहोचल्याचं कळतं. ही माहिती देशात दहशतवाद्यांना मदत करणारा शौकत अहमद भट यानं पोलिसांना दिली. शौकतनं पॉलीग्राफ टेस्टमध्ये सांगितलं, "दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या बाबा ऋषि जंगलातील झाडाला लाल कपडा बांधतात.यानंतर ते तिथंच वाट पाहत राहतात जोपर्यंत त्यांना घ्यायला आलेला त्याच झाडावर हिरवा कपडा बांधत नाही."

Updated: Sep 10, 2015, 12:53 PM IST
... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी title=

नवी दिल्ली: 'लष्कर-ए-तोयबा'चे दहशतवादी भारतात पोहोचल्याचा संदेश देण्यासाठी एक कोड वापरतात. ते झाडावर लाल कपडा बांधतात, ज्यामुळं त्यांच्या म्होरक्यांना ते पोहोचल्याचं कळतं. ही माहिती देशात दहशतवाद्यांना मदत करणारा शौकत अहमद भट यानं पोलिसांना दिली. शौकतनं पॉलीग्राफ टेस्टमध्ये सांगितलं, "दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या बाबा ऋषि जंगलातील झाडाला लाल कपडा बांधतात.यानंतर ते तिथंच वाट पाहत राहतात जोपर्यंत त्यांना घ्यायला आलेला त्याच झाडावर हिरवा कपडा बांधत नाही."

आणखी वाचा -   उधमपूर हल्ल्याच्या ४५ दिवस आधी गुफेत लपून होता दहशतवादी नावेद

शौकतला ५ ऑगस्टला बीएसएफ जवांनावर झालेल्या हल्ल्यानंतर अटक करण्यात आली. या हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाले. तर नावेद या दहशतावाद्याला जिवंत पकडण्यात आलं. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शौकतने त्यांना घ्यायला जायचं होतं, त्यानं उशीर केला त्यामुळं हे दहशतवादी दोन दिवस जंगलात फिरत होते. नावेद शिवाय सैन्याला मदत करणारे खुर्शीद अहमद यांनी शौकत बद्दल भारतीय सैन्याला सांगितलं. 

जम्मू-काश्मीर पोलिसांनी ५ ऑगस्टच्या हल्ल्यानंतर लगेच शौकतला अटक केली होती. यानंतर १ सप्टेंबरला त्याला एनआयएकडे सोपवण्यात आलं. शौकतने पोलिसांना सांगितलं की, तो दोन वेळा सैन्याच्या हाती लागण्यापासून वाचला. पहिल्यांदा जेव्हा तो दहशतवाद्यांना उत्तरेकडून दक्षिण काश्मीरकडे नेत होतो, तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली होती. तर दुसऱ्यांदा याच दहशतवाद्यांना तो जंगलात नेत होता. पण त्यांच्या आधी भारतीय सैन्याचे जवान तिथं पोहोचले होते. 

आणखी वाचा -  नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.