www.24taas.com, नवी दिल्ली
पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर म्हणजेच ७ सप्टेंबरनंतर ही दरवाढ होणार असल्याची शक्यता आहे.
चार ते पाच रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता आहे. यामुळं सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची फटका बसणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळं जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. वाहनांच्या बाजारपेठेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे .