दिमाखदार भारतीय तिरंगा लाहोर शहरातून दिसतोय

 पाकिस्तानातील लाहोर शहरातील नागरिक आता छतावरून भारताचा तिरंगा पाहू शकणार आहेत. भारतातील अटारी बॉर्डवर हा झेंडा लावण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 29, 2017, 04:54 PM IST
दिमाखदार भारतीय तिरंगा लाहोर शहरातून दिसतोय  title=

अमृतसर :  पाकिस्तानातील लाहोर शहरातील नागरिक आता छतावरून भारताचा तिरंगा पाहू शकणार आहेत. भारतातील अटारी बॉर्डवर हा झेंडा लावण्यात आला आहे.

हा झेंडा अतिशय उंच आहे, हा झेंडा ३६० फूट उंच आहे, तर झेंडा १२० फूट रूंद आणि  ८० फूट उंच आहे, अटारी बॉर्डरपासून पाकिस्तानचं लाहोर शहर २१ किमी आहे. हा झेंडा उभारण्यासाठी ३ कोटी ५० लाख खर्च आला. हा तिरंगा भारतातील सर्वात जास्त उंचीचा तिरंगा आहे.

झेंड्याचा व्हिडीओ पाहा सर्वात खाली

पाकिस्तानने हा झेंडा पाहून आरोप लावण्यास सुरूवात केली आहे. हेरगिरी करण्यासाठी भारताने हा झेंडा लावला असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. तसेच बॉर्डरवर असा झेंडा लावणे म्हणजे आंतरराष्ट्रीय सिमेचं उल्लंघन आहे, असं पाकिस्तानने म्हटलं आहे. 

मात्र हा झेंडा बॉर्डरपासून २०० मीटर आत लावण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय नियमांचं कोणतंही उल्लंघन झालेलं नाही.