नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बीएस-3 गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. ऑटो मोबाईल कंपन्यांच्या व्यावसायिक हितापेक्षा जनतेचे स्वास्थ महत्त्वाचे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, एक एप्रिल २०१७ पासून फक्त बीएस-4 गाड्याच भारतात विकता येतील तर बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मॅनिफॅक्चर असोसिएशनने केलेल्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
बीएस-4 म्हणजे भारत स्टेज-4 होय. बीएस-3 च्या मानाने बीएस-4 गाड्यामुळे प्रदुषण कमी होते. त्यामुळे ३१ मार्चनंतर फक्त बीएस-4 मानांकन गाड्यांचीच विक्री करता येणार आहे.