महागाईच्या दरात गेल्या पाच महिन्यातला उच्चांक

महागाईच्या दरात गेल्या पाच महिन्यातला उच्चांक नोंदवला गेलाय. महागाईचा दर ६.०१ टक्क्यांवर गेलाय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता रेल्वे प्रवासही माहागणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2014, 11:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महागाईच्या दरात गेल्या पाच महिन्यातला उच्चांक नोंदवला गेलाय. महागाईचा दर ६.०१ टक्क्यांवर गेलाय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता रेल्वे प्रवासही माहागणार आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या रेल्वेला भाडेवाढीशिवाय पर्य़ाय नाही. तर नाशिक जिल्ह्यात कांदेबाजारात हमाल मापाडयांना देण्यात येणा-या लेव्हीवरून संघर्ष पेटलाय. या संदर्भात काल झालेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाही त्यामुळे बाजार समित्यात कांद्याबाबतचे लिलाव थांबले आहेत.
महागाईच्या दराने गेल्या पाच महिन्यातला उच्चांक गाठलाय. महागाईचा दर ६.०१ टक्क्यांवर गेलाय. भाज्या, फळं, आणि अन्नधान्याच्या किंमतींमुळे महागाईच्या दराने ही मजल मारलीय. सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, इराकमधील राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती ही काही महागाईच्या दरात वाढ होणयाची कारणं आहेत.
बटाट्याच्या दरात ३१.४४ टक्के, तर फळांच्या दरात १९.४० टक्के आणि तांदुळाच्या दरात १२.७५ टक्के वाढ झालीय. गेल्या महिन्यात अन्न पदार्थांचा महागाई दर ९.५० टक्के होता. तर उद्योगांचा महागाई दर ३.५५ टक्के होता. याआधी डिसेंबरमध्ये महागाईच्या दराने ६.४ टक्के दर गाठला होता. त्यातच आता हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय त्याचा परिणाम महागाईच्या दरावर होण्याची चिन्ह आहेत.
दरम्यान, अपु-या पावसाच्या अंदाजामुळेच साठेबाजी होत आहे. साठेबाजांवर आम्ही कारवाई करू असं अर्थमंत्री अरूण जेटली म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.