रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 17, 2014, 10:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र कधी ही वाढ होणार हे मात्र ठरवण्यात आलेलं नाही. त्यातच आता रेल्वेची भाडेवाढ करण्यासाठी रेल्वेला रेल्वे बजेटची वाट पाहण्याची गरज नाही.
जुलैच्या दुस-या आठवड्यात ही वाढ केली जाईल अशी शक्यता आहे. मे महिन्यातच माल वाहतुकीत १४.२ टक्के तर प्रवासी वाहतुकीत ६.५ टक्के भाडेवाढ होण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नव्या सरकारची चाहूल लागल्यावर हा निर्णय रोखून ठेवण्यात आला.
रेल्वेला रोजचा ३० कोटी रूपयांचा तोटा होत आहे. भाडेवाढीतून ८ हजार कोटी रेल्वेला मिळण्याची अपेक्षा होती. रेल्वे मंत्र्यांनी याबाबत आता निर्णय घेणे अपेक्षित आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.