www.24taas.com, झी मीडिया, काश्मीर
काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे, यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
हिमवर्षाव आणि बर्फाची दरी कोसळल्याने अधिक नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.
घर आणि बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम गावाजवळ तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक एअरपोर्ट बंद करावं लागलं आहे, राज्याला जोडणारा रस्ताही बंद झाला आहे.
महामार्ग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फोन आणि इंटरनेट सेवेवरही याचा परिणाम दिसून येतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.