10 रुपयांच्या लालसेपायी त्यानं गमावले सात लाख

केवळ दहा रुपयांच्या लालसेपायी एका व्यक्तीला तब्बल सात लाखांना मुकावं लागलंय. ही घटना घडलीय हैदराबादमध्ये... 

Updated: Jul 17, 2014, 12:29 PM IST
10 रुपयांच्या लालसेपायी त्यानं गमावले सात लाख title=

हैदराबाद : केवळ दहा रुपयांच्या लालसेपायी एका व्यक्तीला तब्बल सात लाखांना मुकावं लागलंय. ही घटना घडलीय हैदराबादमध्ये... 

बँकेत शिरलेल्या एका व्यक्तीला हेरून चोर बँकेच्या बाहेरचा दबा दरून बसले होते... सात लाख रुपये मिळवण्यासाठी त्यांनी 10 रुपयांची नोट रस्त्यावर टाकली... आणि बँकेतून बाहेर पडलेल्या या व्यक्तीकडून तब्बल सात लाख रुपये या चोरट्यांनी हिसकावून नेले. 

अमीरपेट नावाच्या भागात ही घटना घडली. एका खाजगी कार्यलायात काम करणारा सत्यराम ऑफिसच्या कामासाठी बँकेतून सात लाख रुपये काढण्यासाठी बँकेत गेला होता. बँकेतून बाहेर पडल्यानंतर रस्त्यातच त्याच्या दृष्टीस एक 10 रुपयांची नोट दिसली. ही नोट चोरट्यांनीच त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी रस्त्यावर टाकल्याचा संशय पोलिसांना आहे. 

सत्यराम जसा 10 रुपयांची नोट उचलण्यासाठी खाली वाकला. चोरट्यांच्या टोळीनं त्याच्यावर झडप टाकली आणि त्याच्या हाताथून पैशांनी भरलेली बॅग हिसकावली. त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. 

सत्यरामनं आर. एस. नगर ठाण्यात तक्रार नोंदवलीय. पोलिसांनी या चोरट्यांमध्ये दोन-तीन जणांचा समावेश असल्याचं सांगतिलंय.   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.