नवी दिल्ली : नेहरु-गांधी घराण्याची पाचवी पिढी बुधवारी संसदेत पाहायला मिळाली.
प्रियांका गांधी – वडेरा यांचा मुलगा रिहान हा आपल्या मित्रांसोबत संसदेमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे, आपसूकच अनेक कॅमेरे त्याच्यावर खिळलेले पाहायला मिळाले.
व्हिजिटर्स गॅलरीमधून त्यानं लोकसभेचं कामकाज कसं चालतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रियांका गांधी-वडेरा आणि रॉबर्ट वढेरा यांचा रिहान हा मुलगा 13 वर्षांचा आहे. आपल्या आणखी तीन मित्रांसोबत तो लोकसभा अध्यक्षांच्या समोरच्या प्रेक्षकांच्या गॅलरीत बसला होता. यावेळी तो संसदेत त्यानं स्पोर्टिंग जॅकेट परिधान केलं होतं...
जेव्हा मीडियाकडून त्याला हे शाळेचं प्रोजेक्ट आहे का? अशी विचारणा केली तेव्हा त्यानं ‘नाही’ असं उत्तर दिलं. तसंच आपल्याला लोकसभेतलं चित्र आवडल्याचीही प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली.
रिहाननं यावेळी आपल्या आजीला म्हणजेच सोनिया गांधींना संसदेत बसलेलं पाहिलं मात्र त्याला आपल्या मामाला म्हणजेच राहुल गांधींना मात्र पाहता आलं नाही. कारण, राहुल यावेळी संसदेत उपस्थितच नव्हते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान रायबरेली आणि अमेठीमध्ये, 42 वर्षीय प्रियांका गांधी बऱ्याचदा रिहान आणि मिराया या आपल्या दोन मुलांसहीत दिसल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.