नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात पटियासा हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काल जामीन दिल्यानंतर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा म्हटलं की 'माता-पुत्र हे दोघं २०१६ मध्ये तरुगांत जातील असा मला विश्वास आहे.'
'मी ही केस २०१६ मध्ये जिंकेल. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना जेलमध्ये जावं लागेल.' असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
'नॅशनल हेराल्ड ही एक ओपन अँड शट केस आहे. ही केस पुराव्यांच्या आधारावर आहे, साक्षीदारांच्या आधारावर नाही. राहुल आणि सोनिया गांधी या दोघांना कोर्टात तिथेच उभं रहावं लागलं जेथे इतर आरोपी उभे रहातात. दोघांनाही बसण्यासाठी नाही सांगितलं गेलं.' असंही स्वामी यांनी म्हटलं आहे.