मुलीला वाचविण्यासाठी आईचा मगरीसोबत लढा!

गुजरातच्या पडरा शहराजवळ एका गावात आपल्या मुलीला वाचविण्यासाठी आईनं चक्क मगरीला झुंज दिलीय. थिकरियामुबारक गावात एका मोठ्या मगरीनं महिलेच्या १९ वर्षीय मुलीला आपल्या जबड्यात पकडलं होतं. 

Updated: Apr 4, 2015, 04:57 PM IST
मुलीला वाचविण्यासाठी आईचा मगरीसोबत लढा! title=

वडोदरा: गुजरातच्या पडरा शहराजवळ एका गावात आपल्या मुलीला वाचविण्यासाठी आईनं चक्क मगरीला झुंज दिलीय. थिकरियामुबारक गावात एका मोठ्या मगरीनं महिलेच्या १९ वर्षीय मुलीला आपल्या जबड्यात पकडलं होतं. 

घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊची आहे. जेव्हा कांता वांकर विश्वामित्र नदीच्या किनाऱ्यावर कपडे धूत होती. तेव्हा अचानक मगरीनं तिच्या पाय आपल्या जबड्यात पकडून तिला नदीत खेचू लागली. भीतीनं कांता जोर-जोरानं ओरडायला लागली. तेव्हा जवळच उभी असलेली तिची आई दिवाली धावत आली आणि तिनं मुलीचा हाथ घट्ट धरला. दिवालीनं आपल्या दुसऱ्या हातानं जवळच कपडे धुण्यासाठी ठेवलेली बॅट उचलली आणि मगरीवर वार करू लागली. मात्र मगर कुठे ऐकणारी होती. वन अधिकाऱ्यानं सांगितलं की, दिवाली आणि मगरीदरम्यान तब्बल १० मिनीटं झुंज सुरू होती. तेव्हा कुठे आपला पराभव स्वीकारत मगरीनं कांताचा पाय सोडला. 

दरम्यान, कांताच्या पायावर खोल जखम झाली आहे आणि तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं गेलंय. वन अधिकारी अशोक पांड्या यांनी सांगितलं, 'आईनं मगरीवर हल्ला करून आपल्या मुलीला वाचवलं. आम्ही शनिवारी दोघींचं स्टेटमेंट घेऊ. आम्ही स्थानिकांना नदीपासून दूर राहण्यास सांगितलंय. जानेवारीमध्ये जेव्ह वन विभागानं मगरींची मोजणी केली होती, तेव्हा विश्वामित्र नदीत २६० मगरी आढळल्या होत्या.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.