लवकरच 'हार्ले डेव्हिडसन'वर स्वार होणार गुजरात पोलीस

परदेशी पोलिसांप्रमाणेच आता नरेंद्र मोदींच्या गुजरातमधले पोलीस सुपर बाईक्स चालवताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊन नका...

Updated: Dec 30, 2014, 09:46 PM IST
लवकरच 'हार्ले डेव्हिडसन'वर स्वार होणार गुजरात पोलीस title=

अहमदाबाद : परदेशी पोलिसांप्रमाणेच आता नरेंद्र मोदींच्या गुजरातमधले पोलीस सुपर बाईक्स चालवताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊन नका...

2015 मध्ये 'प्रवासी भारतीय दिवस' आणि 'वायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट' आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी, गुजरात पोलिसांच्या एका कमिटीनं पोलिस महासंचालकांना 'हार्ले डेव्हिडसन'सहीत पाच आंतरराष्ट्रीय सुपर बाईक विकत घेण्याचा एक प्रस्ताव सादर केलाय... हा प्रस्ताव मान्य झाला तर हार्ले डेव्हिडसन बाईक वापरण्याचा सर्वात पहिला मान गुजरातच्या पोलिसांना मिळणार आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या बाईक्स चालविण्याची ट्रेनिंग देण्यासाठी कोचही नियुक्त केले जातील. समिटच्या सुरक्षा वर्तुळात सामील होणाऱ्या हार्ले डेव्हिडसन बाईक्सची किंमत 4.1 लाख रुपयांपासून 5.71 लाख रुपयांपर्यंत आहे. 

नुकतंच पोलिसांच्या या कमिटीनं गांधीनगरमध्ये दोन हार्ले डेव्हिडसन बाईक्सची पाहणी केली. पण, अजूनपर्यंत त्यांनी कुठलंही मॉडेल निश्चित केलेलं नाही.

हायटेक कम्युनिकेशनसाठी या बाईक योग्य असाव्यात, हा नियुक्तीचा निकष आहे... ज्यामुळे, कठिण प्रसंगी त्वरीत हालचालींसाठी त्यांचा सर्वोतोपरी वापर होऊ शकेल. यासाठी, हार्ले डेव्हिडसनसोबतच इतरही कंपन्यांचा विचार केला जातोय. तसंच, अगदी दररोज वापरण्यासाठीही या बाईक उपयोगी ठरतील. यासाठी 700 सीसी ते 1500 सीसीपर्यंतच्या सगळ्या रेंजच्या बाईक्सचा विचार केला जातोय... शिवाय त्या बजेटमध्येही असायला हव्यात, असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 

आमच्याकडे पाच सुपरबाईक्स विकत घेण्यासाठी बजेट उपलब्ध आहे... कोणतीही बाईक निश्चित करण्यापूर्वी त्याची ट्रायलही घेतली जातेय... नुकतीच, हार्ले डेव्हडसनची ही ट्रायल पार पडलीय, अशीही अधिकाऱ्यांनी माहिती दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.