मी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 28, 2014, 11:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींबाबत आपलं काय मत आहे? यावर बोलतांना राहुल गांधी म्हणाले, मला वाटतं आगामी निवडणुकांमध्ये आम्ही भाजपचा पराभव करू. मी निवडणूक जिंकणार... काँग्रेस युद्धासाठी तयार आहे आणि जिंकणारही आहे.
आपल्या खासदारांना विचारात न घेता पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणं हे संविधानात लिहिलेलं नाहीय, म्हणून राहुल गांधींनी आपल्या एआयसीसी बैठकीत आपल्या भाषणात केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. २००९मध्ये आमच्याकडे तत्कालीन पंतप्रधान होते. पंतप्रधानांनी निवडणूक जिंकली. खासदारांनी निर्णय घेतला के तेच या पदावर राहतील.
आरटीआय अंतर्गत राजकीय पक्षांना आणण्याबाबतच्या प्रश्नाचं उत्तर देणं राहुल गांधींनी टाळलं. माझ्या मते पक्षांना स्वातंत्र असणं चांगलं आहे, पण संसदेनं सर्वसंमतीनं याबाबत निर्णय घ्यावा. २००२मधील गुजरात दंगलीसाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचं सरकारच जबाबदार असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.