लग्नाच्या आधी पळाला नवरदेव

गाझियाबादच्या मसूरीमध्ये साखरपुड्याच्या काही वेळ आधी मुलगा पळून गेल्याची घटना घडली. 

Updated: Mar 5, 2016, 03:37 PM IST
लग्नाच्या आधी पळाला नवरदेव title=

गाझियाबाद: गाझियाबादच्या मसूरीमध्ये साखरपुड्याच्या काही वेळ आधी मुलगा पळून गेल्याची घटना घडली. साखरपुड्याच्या विधी सुरु असतानाच मुलीच्या नातेवाईकांना हे लक्षात आलं आणि मंडपामध्ये एकच गोंधळ सुरु झाला. 

हा सगळा गोंधळ सुरु असताना ग्रामपंचायतीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावामध्ये पंचायतीची बैठक बोलवण्यात आली.  या मुलीचं लग्न पळून गेलेल्या मुलाच्या भावाबरोबर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 

ठरलेल्या दिवशीच या मुलीचं लग्न होईल, असंही या बैठकीत ठरव्यात आलं. तसंच या मुलावर घरातही बहिष्कार टाकण्याचे आदेश ग्रामपंचायतीनं दिले आहेत. 

मेरठच्या धर्मलाप सिंह यांनी आपल्या छोट्या मुलीचं लग्न श्यामपाल सिंह यांचा मुलगा करण सिंह याच्याबरोबर ठरवलं होतं. पण साखरपुड्यावेळी करणसिंह आपल्या मित्रांबरोबर पळून गेला.  तो पळून का गेला याचं कारण मात्र अजूनही समजू शकलं नाही.