भारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही

अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय. 

Updated: May 5, 2015, 04:02 PM IST
भारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही title=

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय. 

गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, दाऊस यावेळेस कुठे लपून बसलाय याबद्दल सराकारकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सरकारला ते ठिकाणही माहीत नाही. दाऊद कुठे आहे हे माहीत पडल्यानंतर त्याच्या प्रत्यर्पणाची कारवाई सुरू केली जाईल परंतु, दाऊदच्या ठिकाणाचा आत्तापर्यंत कोणताही क्लू मिळालेला नाही. 

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपर्यंचत दाऊदनं मुंबईवर एकछत्री राज्य केलं. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी हरएक प्रयत्न करून पाहिले... पण  निष्फळ... तो अजूनही मोकळा फिरतोय. भारतानं मे, २०११ मध्ये पाकिस्तानला दहशतवाद्यांची एक यादी सोपवली होती. यामध्ये ५० दहशतवांद्यांच्या नावाचा समावेश होता. हे दशतावादी पाकिस्तानात बसून भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचा सततत प्रयत्न करत असतात. या यादीत दाऊद दुसऱ्या क्रमांकावर होता.

लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना गृहराज्यमंत्री हरीभाई परथीभाई चौधरी यांनी आत्तापर्यंत दाऊदचा कोणताही पत्ता नाही. एकदा दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याचा पत्ता लागल्यानंतर त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकेल, असं म्हटलंय. 

देशातील वेगवेगळ्या दहशतवादी प्रकरणांतील आरोपी दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची स्थिती काय आहे, असा प्रश्न राय यांनी सरकारला विचारला होता. यावर, १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिमविरुद्ध रेड कॉर्नर नोटिस क्रमांक ०१३५:४.१९९३ लागू केली गेलीय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनंही त्याच्याविरुद्ध विशेष नोटीस जारी केलंय. परंतु त्याचा आत्तापर्यंत पत्ता लागलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.