चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी

चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता बसवले जाणार असल्याचं म्हटलं जातंय. दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका येणार आहे. मोदींच्या घांची तेली समाजाचा इतिहास या मालिकेतून दाखविला जाईल. 

Updated: May 5, 2015, 01:55 PM IST
चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली : चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता बसवले जाणार असल्याचं म्हटलं जातंय. दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका येणार आहे. मोदींच्या घांची तेली समाजाचा इतिहास या मालिकेतून दाखविला जाईल. 

काही इतिहासकारांच्या मते चंद्रगुप्त हा मोरिया आदिवासी जमातीमधला होता आणि नंतर त्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. तर त्याच्याच वंशातल्या सम्राट अशोकाने कलिंगा युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता.

'दिये जलते है' या मालिकेच्या शुटिंगला गुजरातमधील गांधीनगरमध्ये सोमवारी सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान मोदींचे भाऊ सोमनाथ मोदी हे देखील उपस्थित होते. सदर मालिकेच्या पहिल्या भागाच्या चित्रीकरणाची सुरुवात आई आणि मुलाने झाली. 

आई आपल्या लहान मुलाला तेली समाजाचा इतिहास, चंद्रगुप्त, अशोका आणि मोदी यांच्याबाबत सांगत असल्याचे दृश्य चित्रीत करण्यात आले.  ही मालिका १२८ भागांमध्ये प्रसारित होईल. ऑक्टोंबरमध्ये ही मालिका दुरदर्शनवर झळकेल असे सूत्रांनी सांगितले. मात्र, मोदी यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप न ठरल्याचे मूळ पुण्याचे असलेल्या निर्माता सुरेश चौधरी यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.