गूगलला भेट देणारे मोदी 'जगातील सर्वांत मूर्ख पंतप्रधान', गूगलने केला अपमान

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्याहून भारतात परतलेत. या दौऱ्यात मोदींनी अमेरिकेत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचीही भेट घेतली. पण, पिचाईंची भेट घेणारे पंतप्रधान 'जगातील सर्वात मूर्ख पंतप्रधान आहेत' असं गूगल सर्चवर अजूनही दिसतंय.

Updated: Oct 1, 2015, 01:24 PM IST
गूगलला भेट देणारे मोदी 'जगातील सर्वांत मूर्ख पंतप्रधान', गूगलने केला अपमान title=

नवी दिल्ली : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्याहून भारतात परतलेत. या दौऱ्यात मोदींनी अमेरिकेत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचीही भेट घेतली. पण, पिचाईंची भेट घेणारे पंतप्रधान 'जगातील सर्वात मूर्ख पंतप्रधान आहेत' असं गूगल सर्चवर अजूनही दिसतंय.

या दौऱ्याच्या वेळी मोदींचं स्वागत खुद्द सुंदर पिचाई यांनी केलं होतं. तरीही, आत्ता तुम्ही गूगल इमेजवर जाऊन 'world's most stupid prime minister' असा सर्च कराल तर तुम्हाला यात पंतप्रधान मोदींचा फोटो दिसेल. 

हे काही पहिल्यांदाच घडलंय असंही नाही. अशी घटना यापूर्वीही समोर आली होती. गूगलला यासाठी सोशल मीडियानं धारेवरही धरलं होतं.... सोबतच, अल्गोरिदम बदलण्याचा सल्लाही मिळाला होता. पण, यातून गूगलनं कोणताही धडा घेतलेला नाही. आत्ता पुन्हा एकदा जगातील सर्वात मुर्ख पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा फोटो समोर येताना दिसतोय.

एव्हढंच नाही तर यापूर्वीही 'टॉप टेन क्रिमिनल्स' (गुन्हेगार) असा सर्च केल्यानंतरही नरेंद्र मोदींचा फोटो गूगलवर दिसत होता. यानंतर, लोकांसोबतच काँग्रेनंही याचा समाचार घेतला होता. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याचा स्क्रीन शॉट टाकत 'माझे पंतप्रधान मोदींशी हजार मुद्यांवर वाद असतील पण, गूगलच्या टॉप 10 क्रिमिनल्समध्ये पंतप्रधानांचा फोटो सहन केलं जाणार नाही' असं त्यांनी म्हटलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.