एलपीजी गॅस सबसिडीसाठी चांगली बातमी

रगुती गॅसवर मिळणारे अनुदान सरळ ग्राहकांच्या खात्यात देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना 'पहल'चा (प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ) फायदा मिळवायचा असेल तर तुमच्या हातात फक्त १० दिवस उरलेत. डीबीटीएल नावाने सुरू केलेल्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (पहल) असे नामकरण केलेय.

Updated: Jun 20, 2015, 12:25 PM IST
एलपीजी गॅस सबसिडीसाठी चांगली बातमी title=

नवी दिल्ली : रगुती गॅसवर मिळणारे अनुदान सरळ ग्राहकांच्या खात्यात देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना 'पहल'चा (प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ) फायदा मिळवायचा असेल तर तुमच्या हातात फक्त १० दिवस उरलेत. डीबीटीएल नावाने सुरू केलेल्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (पहल) असे नामकरण केलेय.

या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी एलपीजी ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये आपला आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे. यामुळे गॅसवर मिळणारे अनुदान थेट आपल्या खात्यात मिळू शकणार आहे. या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीतील अनुदानासाठी जर तुम्ही आधार क्रमांक लिंक केला नसेल तर ३० जूनपर्यंत करू शकता.

या मुदतीत आधार लिंक न केल्यास १ एप्रिल पासून ३०  जून या कालावधीतील अनुदान मिळणार नाही. याशिवाय (पहल) योजनेअंतर्गत आधार लिंक केल्यावर मिळणारे ५६८ रूपयांचे अनुदानही मिळणार नाही. जे ग्राहक आधार लिंक करणार नाहीत त्यांना एलपीजी गॅस बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे.

 
यापूर्वी गॅस कंपन्यांनी मार्च महिन्यात आधार लिंक करण्यासाठी ग्रेस कालावधी दिला होता. या कालावधीत ग्राहकांना विनाअनुदानीत गॅस सिलेंडर दिले होते. सोबतच एप्रिल ते जून कालावधीत आधार लिंक केल्यास अनुदान खात्यात जमा केली जाईल, अशी सूटही दिली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.