लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांसाठी खुश खबर

रेल्वे प्रवाशांसाठी कमी भावात पिण्याचं पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती इंडियन इंडियन रेल्वे  कॅटरिंग अॅंड टूरिजम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) यांनी दिली आहे. 

Updated: Jul 9, 2015, 02:49 PM IST
लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांसाठी खुश खबर title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी कमी भावात पिण्याचं पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती इंडियन इंडियन रेल्वे  कॅटरिंग अॅंड टूरिजम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) यांनी दिली आहे. 

एका इंग्रजी दैनिकात छापलेल्या बातमीनुसार लवकरचं रेल्वे स्थानकावर 5 रुपयांमध्ये एक  लीटर पाण्याची बाटली उपलब्ध होणार आहे. 
 
(आईआरसीटीसी) 1200 रेल्वे स्थानकावर 5 हजार वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्याची योजना आखत आहे. यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध पाणी मिळू शकेल.

या यूरेका फोर्ब्स आणि केंट आरओ सारख्या कंपन्यांना वॉटर वेंडिंग मशीन्स चालवण्याचे कंत्राट मिळू शकते.

थंड पाणी प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कंपन्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दोन वेंडिंग मशीन्स लावणार आहे. 15 ते 20 रूपये पाण्यासाठी खर्च करणाऱ्या प्रवाशांना, या मशीन्समुळे मात्र एक ते पाच रुपयांपर्यंत पाणी मिळू शकते. यामुळे ट्रेनने लांब पल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खुश खबरचं म्हणायला हवी.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.