नवी दिल्ली: दरोडेखोरांनी खासगी बँकेची रक्कम वाहून नेणारी ‘कॅश व्हॅन‘ शनिवारी सकाळी लुटली असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बँकेची रक्कम असलेली ‘कॅश व्हॅन‘ कमलानगर भागामध्ये असताना दरोडेखोरांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी रक्षारक्षकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.
यावेळी दरोडेखोर दीड कोटी रुपयांची रक्कम लुटून पसार झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.