सोन्याच्या भावात पुन्हा घसरण

१६ वर्षात पहिल्यांदाच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सहाव्या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे.

Updated: Aug 1, 2015, 05:53 PM IST
सोन्याच्या भावात पुन्हा घसरण title=

नवी दिल्ली : १६ वर्षात पहिल्यांदाच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सहाव्या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे.

शुक्रवारी सोने प्रति ग्रॅम २,३५६ रूपयांपर्यंत स्थिरावले. गुरूवारपेक्षा शुक्रवारी सोन्याच्या किमतीत चार रूपये प्रति ग्राममागे घट झाली आहे.  दिल्लीत शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी २४,७०० रूपये  होता. 
"२००० आणि २००१ या वर्षात सोन्याच्या दरात सतत घसरण होत होती. यानंतर बऱ्याच वर्षांनंतर भावात एवढी घसरण दिसून येत आहे" अशी माहिती एनएसी ज्वेलर्स व्यवस्थापकीय संचालक एन अनंत पद्मनाभम यांनी दिली आहे.

"सोन्याच्या किमतीत होणारी ही घट काही काळ अशीच राहणार आहे. जागतिक किमतीत जेव्हा प्रति पौंड १,०८० डॉलर उत्खनन खर्चाची बरोबरी करेल तेव्हाच ही स्थिती निर्माण होईल, कारण तेव्हा उत्खनन कंपन्या आपले उत्पादन थांबवतील" अशी माहिती मद्रास ज्वेलर्स अॅंड डायमंड मर्चेंटस असोसिएशनचे अध्यक्ष जयंतीलाल चल्लानी यांनी दिली आहे. 

"सोन्याच्या किमतीत जरी मोठ्या प्रमाणात घट दिसत असली तरी सोन्याच्या खरेदीत मात्र वाढ झालेली नाही. लोक अजुनही सोन्याच्या किमतीत अजून घट होण्याची वाट बघत आहेत", असे वक्तव्य पीपी ज्वेलर्सचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी दिल्लीत केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.