सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ

सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला. 

Updated: May 7, 2015, 10:54 AM IST
सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ title=

नवी दिल्ली : सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला. 

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण नोंदल्याने आयात महाग झाली. तसेच समभाग बाजाराने जोरदार आपटी खाल्ल्याने सराफ्यात सकारात्मक कल राहिला.

जागतिक बाजारातील तेजी आणि हंगामी खरेदीमुळे बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सकारात्मक कल नोंदला गेला असल्याचं म्हटलं जात आहे.

बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारात तेजीचा कल राहिल्याने स्थानिक सराफ्यातही जोरदार खरेदी झाली.  निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी लग्नसराईची खरेदी केल्याने बाजार धारणेस सकारात्मक चालना मिळाली असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.