नेपाळमध्ये जाळला नरेंद्र मोदींचा पुतळा

नेपाळला हादरवून टाकणाऱ्या भयंक भूकंपानंतर तातडीनं भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदत पुरवली. पण, त्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर #GoHomeIndianMedia हे कॅम्पेन सुरू झालं... यानंतर, आता नेपाळमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला गेल्याचं समोर येतंय. 

Updated: May 6, 2015, 07:51 PM IST
नेपाळमध्ये जाळला नरेंद्र मोदींचा पुतळा title=

नवी दिल्ली : नेपाळला हादरवून टाकणाऱ्या भयंक भूकंपानंतर तातडीनं भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदत पुरवली. पण, त्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर #GoHomeIndianMedia हे कॅम्पेन सुरू झालं... यानंतर, आता नेपाळमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला गेल्याचं समोर येतंय. 

नेपाळमध्ये 60 वर्षांपूर्वी भारताच्या मदतीनं पूर्व-पश्चिम महेंद्र राजमार्ग बनविला गेला होता. नेपाळ मीडियाच्या बातम्यांनुसार, नेपाळच्या काही जिल्ह्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या या राजमार्गावर इटहरी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला गेलाय.  
 
'नेपाळमध्ये भारताचा हस्तक्षेप बंद करा' अशी घोषणाबाजी करत काही विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.