दिवाळीच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त

Updated: Oct 7, 2014, 05:48 PM IST
दिवाळीच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त title=

नवी दिल्लीः जागतिक स्तरावर सोन्याच्या भावात  0.16 टक्क्याने घट झाली आहे. सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 26 हजार 678 रूपयांनी घसरला आहे.

संपूर्ण देशात दिवाळीच्या तोंडावर सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे सराफांच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. ग्राहकांचा कल सोन्याची नाणी आणि इतर दागिने खरेदी करण्याकडे दिसून येतोय.

सोने खरेदी करण्यासाठी आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. पण, त्याचबरोबर लग्नसराईसाठी देखील सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून आली.

बाजार विश्लेषकांच्या मते, सोन्याची किंमत कमी होण्यामागचे श्रेय डॉलरला दिले पाहिजे. कारण जागतिक स्तरावर डॉलरची किंमत वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव कमी  झाल्याचे सांगितले आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक व्यापारी आणि उद्योजक पुढे सरसावले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.