नवी दिल्ली : जागतिक बाजारातील काही कारणांमुळे आणि सराफा बाजारातून सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोमवारी सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळायली. तर चांदीचे दरही घसरले.
सोने 150 रुपयांनी घसरुण 25,850 रुपयांवर आले आहे. तर चांदीच्या दरातही 150 रुपयांनी घट झाली असून 33,700 रुपयांवर पोहोचले आहे.
व्यापारी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेच्या व्याज धोरणांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. जागतिक बाजारात सोने 0.3 टक्क्यांनी घसरलं. काही दिवसांपूर्वीच सोन्याचे दर 290 रुपयांनी वाढले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.