लालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर प्रचंड टीका करत सत्तेत आलेल्या आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. 

Updated: Dec 14, 2015, 09:48 PM IST
लालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा title=

औरंगाबाद : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर प्रचंड टीका करत सत्तेत आलेल्या आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. 

लालू यादव यांनी जीएसटी बिलवर मोदी सरकारला समर्थन देण्याचं वक्तव्य केलं आहे. नितीश कुमार यांनीही या बिलसाठी मोदी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. 

आज एका कार्यक्रमादरम्यान लालू यादव यांनी 'आम्ही प्रत्येक चांगल्या कामाचं समर्थन करू' असं वक्तव्य करत 'केंद्र सरकार हे मागासलेल्या राज्यांकडे दुर्लक्ष करतेय' असाही आरोप केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.