गोवा परदेशी पर्यटकांची पाठ, तरीही तोबा गर्दी

युक्रेन आणि रशियात सुरु असलेल्या तणावामुळे यंदा गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मात्र उन्हाच्या वाढत्या झळा आणि तापमानानं गाठलेली चाळीशी यामुळे देशी पर्यटकांनी गोव्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे.

Updated: May 23, 2015, 07:57 PM IST
गोवा परदेशी पर्यटकांची पाठ, तरीही तोबा गर्दी title=

 पणजी : युक्रेन आणि रशियात सुरु असलेल्या तणावामुळे यंदा गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मात्र उन्हाच्या वाढत्या झळा आणि तापमानानं गाठलेली चाळीशी यामुळे देशी पर्यटकांनी गोव्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे.

मे महिन्याच्या असह्य उकाड्यावर उतारा म्हणजे गोवा... सध्या गोव्यात देशी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. शाळेला लागलेल्या सुट्यांमुळे त्यात आणखीनच भर पडली आहे.  इथली मंदिरे चर्चेस ही पर्यटकांची आवडती ठिकाणी आहेत. 

पर्यटकांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहिलंय ते इथले समुद्र किनारे. कलगुंड, बागा, सिक्केर, वागातोर असे सर्वच किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेत. सागराच्या अथांग लाटा अंगावर घेत मस्त डुंबण्यासोबतच किना-यावरच्या वॉटर स्पोर्टनं सुटीची रंगत आणखीन वाढवलीये. 

यंदा रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या तणावामुळे परदेशी पर्यटकांची संख्या काहीशी कमी झालीये. मात्र त्याची कसर देशी पर्यटकांनी भरून काढल्यानं स्थानिकही खुश आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.