नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सरदारांवर करण्यात येणाऱ्या विनोदांवर बंदी आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती.
एखाद्या समाजावर विनोद करणे कसे चुकीचे आहे, हे विद्यार्थ्यांसह समाजाला पटवून देणे महत्त्त्वाचे असल्याचे कमिटीने दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते. तसेच अशाप्रकारच्या विनोदांवर बंदी आणावी, अशी मागणी केली होती. अशा विनोदांना रोखण्यासाठी याचिकाकर्त्यांनी सहा आठवड्यांत मार्गदर्शक तत्त्वे सादर करावीत, असे आवाहन न्यायालयाने दिले आहेत.
सरदारांवर करण्यात येणारे विनोद बंद व्हावेत, यासाठी दिल्लीतील शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. वांशिक किंवा एखाद्या समाजाविरोधात विनोद पसरवणे थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची गरज असल्याचे सांगत त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.