तरुणीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ 'फेसबुक'वर टाकला

20 वर्षीय एका तरुणीवर तिच्याच एका मित्रानं आपल्या काही मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. इतकंच नाही तर या नराधमांचं दुष्कृत्य इथंच थांबलं नाही तर तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर शेअर केला.  

Updated: Jun 25, 2014, 09:48 AM IST
तरुणीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ 'फेसबुक'वर टाकला title=
फाईल फोटो

मुजफ्फरनगर : 20 वर्षीय एका तरुणीवर तिच्याच एका मित्रानं आपल्या काही मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. इतकंच नाही तर या नराधमांचं दुष्कृत्य इथंच थांबलं नाही तर तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर शेअर केला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 6 ऑगस्ट रोजी पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत जेवणासाठी बाहेर गेली होती. बासधादा नामक गावापाशी या दोघांना काही चार तरुणांनी अडवलं. या दोघांना घेऊन ते एका निर्जनस्थळी गेले... इथं अगोदरपासूनच तीन जण थांबले होते.  

मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार, पाच जणांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला तर इतर तीघं जण या घटनेचं व्हिडिओ शुटींग करत होते. या घटनेची पोलिसांत तक्रार केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही या नराधमांनी तिला दिली.

या संपूर्ण प्रकारानं हादरून गेलेल्या पीडित तरुणी हे नराधम हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करतील या भीतीनं घाबरली होती. यामुळेच पोलिसांत तक्रार नोंदविण्याचं धैर्य ती दाखवू शकली नाही. परंतु, या नराधमांनी हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आणि या तरुणीच्या सहनशक्तीचा अंत झाला. त्यानंतर तिनं पोलीस स्टेशन गाठलं.

पोलिसांनी भारतीय दंड विधान आणि आय टी कायद्याच्या विविध कलमांखाली आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आरोपींमध्ये राशिद, वासिक, अब्दुल रहमान, शोकन, अबुल, मोनू, राहुल आणि सलाऊ या तरुणांचा समावेश आहे. यापैंकी चार जणांना अटक करण्यात आलीय तर उरलेल्या चार जण अद्यापही फरार आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.