www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातचे बिग बिझनेस टायकून आणि देशाचे होऊ घातलेले नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदाणींवर यूपीए सरकारने अखेर 5500 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस बजावली आहे. या कारणानेच जाता जाता केंद्र सरकारने मोदींच्या निकटवर्तीय असलेल्या अदाणी विरूद्ध मुद्दाम नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने अदाणी ग्रुपला एका ऊर्जा प्रकल्पासाठी आयात करण्यात आलेल्या उपकरणांच्या किमती अधिक दाखवल्याच्या आरोप ठेवला आहे. या आरोपाखालीच अदाणी ग्रुपला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रेव्हेन्यू इंटेलिजंस डायरेक्टरेटने मुंबईमध्ये ही नोटीस जारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेहमीच राहुल गांधी हे मोदी आणि अदाणी यांच्या संबंधांवर बोलत होते. अदाणींसोबत मोदींचे असलेल्या संबंध लोकांना पटावे या साठी मोदींनी त्यांना टॉफीच्या भावात जमीनी दिल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. अदाणी यांनी मात्र आपल्या ग्रुपचे देशातील सगळ्याच राज्य सरकारांशी विकासासाठी संबंध असल्याचे सांगितले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.