www.24taas.com, नवी दिल्ली
एकीकडे पेट्रोल महाग झालं असतानाच गॅस सिलेंडरच्या दरांत 130 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ करत असतानाच सबसिडी असलेल्या सिलेंडरची संख्या 6 वरून 12 वर नेत ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावात डिझेलचा दरही साडेचार रुपयांनी वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे. दुसरीकडं पेट्रोलियम मंत्रालयानं वाहन इंधन आणि एलपीजीच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियममंत्री विरप्पा मोईली यांनी याबाबत संकेत दिलेत.
मारुतीच्या कारही आजपासून महागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व 14 मॉडेल्सच्या किमतीत 1 ते 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मारुतीच्या कारची किंमत 20 हजार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.