मल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कातही होणार वाढ

मल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कामध्ये १० ते २० टक्के वाढ करण्यात आल्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांना दणका बसला आहे.

Updated: Jan 16, 2013, 05:00 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कामध्ये १० ते २० टक्के वाढ करण्यात आल्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांना दणका बसला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. करमणूक शुल्क वाढीमुळे तिकीट दरात ५ ते १० टक्के वाढ होणार आहे.
तर सिंगल स्क्रीन थिएटरच्या करमणूक शुल्क माफीची मर्यादा ५ वर्षांवरून ७वर नेण्यात आली आहे.मात्र नगरपालिका क्षेत्रांत शुल्कमाफी ५ वर्षांचीच असणार आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्सना चांगलाच दणका बसला आहे.

मल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कात
१० ते २० टक्के वाढ

करमणूक शुल्क वाढीमुळे तिकीट दरात
५ ते १० टक्के वाढ होणार

सिंगल स्क्रीन थिएटरच्या करमणूक
शुल्क माफीची मर्यादा ५ वर्षांवरून ७वर नगरपालिका क्षेत्रांत मात्र शुल्कमाफी ५ वर्षांचीच