नोटबंदीनंतर १८ लाख बँक खात्यांमध्ये झाली गडबड

 देशभरातील वेगवेगळ्या बँकेतील १८ लाख खात्यांमध्ये नोटबंदी दरम्यान गडबड झाली असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकार या खाते धारकांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती देत म्हटलं की, नोटबंदीनंतर १८ लाख खात्यांची माहिती मिळाली आहे ज्यामध्ये जमा पैसा हा खातेधारकांच्या उत्पन्नाशी जुळत नाही. अशा खात्यांवर सरकारची नजर आहे आणि अशा सर्वांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

Updated: Apr 7, 2017, 10:43 PM IST
नोटबंदीनंतर १८ लाख बँक खात्यांमध्ये झाली गडबड title=

नवी दिल्ली : देशभरातील वेगवेगळ्या बँकेतील १८ लाख खात्यांमध्ये नोटबंदी दरम्यान गडबड झाली असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकार या खाते धारकांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती देत म्हटलं की, नोटबंदीनंतर १८ लाख खात्यांची माहिती मिळाली आहे ज्यामध्ये जमा पैसा हा खातेधारकांच्या उत्पन्नाशी जुळत नाही. अशा खात्यांवर सरकारची नजर आहे आणि अशा सर्वांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत ही माहिती दिली. नोटबंदीनंतर निष्क्रिय खात्यांमध्ये किंवा जनधन योजनेत उघडलेल्या खात्यांचा दुरुपयोग केला गेला. सरकार याची चौकशी करत आहे. यासाठी तज्ञ्जांनी मदत घेतली जाणार आहे.

जेटलींनी म्हटलं की, नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात पैसा जमा करणाऱ्या लोकांवर सरकारची नजर आहे. काही लोकांना याबाबत माहिती मागवण्यात आली आणि काही लोकांनी माहिती देखील दिली आहे. ज्यांनी माहिती नाही दिली अशा लोकांवर कारवाई होणार आहे.