नवी दिल्ली : २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय जवान राजपथावर परेडची प्रॅक्टीस करत आहेत. पण यावेळे भारतीय जवानांसोबत फ्रान्सचे जवानही परेड करतांना दिसणार आहेत आणि हे देशात पहिल्यांद घडत आहे.
फ्रान्सचे काही जवान सुरतवाडी येथे पोहोचले असून त्यांनीही सरावाला सुरूवात केली आहे. 16 जानेवारीपर्यंत हा सराव सुरू असणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसुआ ओलांद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.