लिबिया : लिबियाच्या सिर्त भागातून चार भारतीयांचं अपहरण झालंय. अतिरेकी संघटना इसिसनं हे अपहरण केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हे चौघेही तिथल्या एका विद्यापीठात शिक्षक आहेत. यातले दोन हैदराबादचे एक जण बंगळूरचा तर एक जण रायपूरचा आहे.
हे चौघे जण त्रिपोली आणि ट्युनिसहून भारतात परतत असताना त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता परराष्ट्र मंत्रालयानं वर्तवलीय.
यातले तीन जण सिर्त विद्यापीठात शिक्षक आहेत, तर एक जण विद्यापीठाच्या जाफरा शाखेमध्ये काम करतो.
या नागरिकांना सोडवण्यासाठी त्रिपोलीतल्या भारतीय मिशनची मदत घेण्यात येतेय. अद्याप त्यांना सोडण्यासाठी कोणतीही खंडणी मागितली गेली नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीये.
उल्लेखनीय म्हणजे, इसिसच्या भारताविरुद्ध कारवाया रचण्याच डाव सुरु आहे. अशातच, भारतानं लिबियामध्ये राहणाऱ्या भारतीयांना याअगोदरच तशी सूचनाही दिली होती... अनेक जण तिथून परतले पण काही जणांनी मात्र स्वेच्छेनं तिथंच राहण्याचा निर्णय घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.