बंगळुरू : कर्नाटकमधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम. कृष्णा यांनी आज अखेर भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीमध्ये त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळतच कृष्णा यांनी भाजपाची झूल पांघरलीये.
गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षप्रवेशाची चर्चा होती. पुढल्या वर्षी कर्नाटकमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झालंय...
यावर कर्नाटकातलेच काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी नापसंती व्यक्त केलीये.