नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील.
हा निर्णय दिल्ली आणि दिल्ली बाहेरच्या शहरातील खासगी वाहनांनाही लागू होणार आहे. सीएनजीवर चालणा-या बस टॅक्सी आणि ऑटो रिक्शा तसेच व्यवसायिक वाहनांना या निर्णयातून वगळण्यात आलंय.
मात्र आप सरकारनं लागू केलेल्या या निर्णयाला केजरीवाल सरकारमधूनच विरोधाचा सूर पहायला मिळतोय.आप नेता अशुतोषनं या निर्णयाला विरोध दर्शवला. तसेच भाजपा आणि काँग्रेसनंही हा निर्णय अव्यवहारिक असल्याचं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.