श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.
आज सकाळी दहा वाजता श्रीहरिकोटा इथल्या अवकाळतळावरुन पीएसएलव्ही सी - २० या रॉकेटव्दारं 'अॅस्ट्रोसॅट'चं प्रक्षेपण करण्यात आलं. अॅस्ट्रोसॅटचं वजन १,५१३ किलो असून अॅस्टोसॅटसोबत आणखी सहा विदेशी उपग्रहांचंही प्रक्षेपण करण्यात आलं.
PSLV-C30 successfully launches ASTROSAT into the orbit pic.twitter.com/tzhDYJOP9j
— ISRO (@isro) September 28, 2015
खगोलीय घटकातील विविध फ्रिक्वेन्सीचं एकाच वेळी निरीक्षण करणं अॅस्ट्रोसॅटच्या माध्यमातून शक्य होणार आहे. इस्त्रोसोबत पुण्यातील आयुका, टाटा मुलभूत संशोधन संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, रामन रिसर्च सेंटर या संस्थाही या मोहीमेत सहभागी होत्या.
इस्रोची ही मोहीम PSLV या प्रक्षेपकाची सलग 29वी यशस्वी मोहीम ठरलीय. इस्रोनं आतापर्यन्त विविध देशांचे 45 उपग्रह यशस्विरित्या अवकाशात धाडले आहेत आणि आजच्या सहा उपग्रहांसोबतच भारतानं 51चा आकडा गाठलाय.
आज आपण Astrosat बरोबर (1513 किलो) सहा इतर देशांचे उपग्रह पाठवले आहेत. यात अमेरिकेचे प्रत्येकी 28 किलो वजनाचे चार नॅनो उपग्रह, 76 किलो वजनाचा इंडोनेशियाचा उपग्रह आणि 14 किलोचा कॅनडाचा उपग्रह आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.